सरकारी बँकेत तुम्ही नोकरी शोधताय का? मग तुम्हाला भरपूर संधी आहे. अनेक सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. त्यात आयबीपीएसद्वारे भरती, एसबीआय आणि रिझर्व्ह बँक यांचा समावेश आहे.
आयबीपीएस 12 हजार क्लार्क पदांवर तुमची परीक्षा घेईल. आयबीपीएस क्लार्क पदासाठी अर्ज सुरू केलेत. स्टेट बँक ऑफ इंडियात (SBI) 700 पदांवर भरती होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये Grade B साठी 199 पदांवर व्हेकन्सी आहे.
IBPS क्लार्कच्या 12 हजार पदांवर भरती परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालंय. अर्ज करण्यासाठी www.ibps.in इथे क्लिक करा. या व्हेकन्सीद्वारे आंध्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूको बँक, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, इलाहाबाद बँक, कॅनरा बँक, इंडियन ओवरसीज बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, भारतीय बँक, पंजाब आणि सिंध बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये नोकरी आहे.
SBI मध्ये अप्रेंटिससाठी 700 पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांवर अर्ज स्वीकारणं सुरू आहे. अर्जाची शेवटची तारीख आहे 6 ऑक्टोबर 2019.
https://www.sbi.co.in/careers/https://www.sbi.co.in/careers/ वर जाऊन अर्ज करा.
SBI चं नोटिफिकेशन पाहायला https://sbi.co.in/webfiles/uploads/files/careers/2019_09_1225_SBI_Web_Page_Engagement_of_Apprentices_Notice.pdf इथे क्लिक करा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये Grade B (DR)च्या ऑफिसर पदांसाठी 199 व्हेकन्सीज आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे 11 ऑक्टोबर 2019. अर्ज करण्यासाठी rbi.org.in इथे अर्ज करा.
Comments
Post a Comment
Your comments are important for us!