नवी मुंबई - वाशीत ३४ वर्षीय तरुणावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात त्याला नारळावर बसवून वरून दाब देऊन पार्श्वभागात नारळ घुसवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे सुमारे १२ सेंटीमीटर आतमध्ये गुदमार्गात अडकलेला नारळ बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना साडेतीन तासाची शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र, हे भीषण कृत्य करणारे आरोपी अद्यापही मोकाटच असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी पाच पैकी तीन जणांनी त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. यानंतर त्यांनी घटनास्थळीच पडलेल्या कुजलेल्या नारळाला निरोधचे सात थर लावून तो पीडित तरुणाच्या पार्श्वभागात घुसवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो आत न गेल्याने पीडित तरुणाला नारळावर बसवून पाचही जणांनी त्याच्यावर वरून दबाव टाकून तो आत घुसवल्याची धक्कादायक माहिती पीडिताने पोलिसांना दिली आहे. मात्र यावेळी झालेल्या रक्तस्त्रावामुळे तो बेशुद्ध पडला असता तो मृत पावल्याचे समजून पाचही गर्दुल्यांनी तिथून पळ काढला. काही वेळानंतर पिडीत तरुण शुद्धीवर आला असता त्याने, मदतीसाठी आवाज दिला. परंतु तिथे कोणीच नसल्याने बळ एकवटून तो झाडीतून बाहेर आला व दुचाकीवरून स्वतःच रुग्णालय गाठले. यावेळी त्याच्या गुदमार्गातल्या नारळचे आतले टोक सुमारे १२ सेमी आत असून त्यापासून आतड्यांना दुखापत झाल्याचे आढळून आले. तर शेवटचे टोक ४ शरीराच्या वरच्या भागापासून आतमध्ये असल्याने तो नारळ काढायचा कसा असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता.
गुदमार्गात नारळ घुसल्याची जागतीक स्तरावरील ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी २०० हून अधिक तज्ञांचे सल्ले घेण्यात आले. त्यानंतर नारळाला ड्रिल मशीनने छेद पाडून शरीरातच त्याचे तुकडे करून तो बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सुमारे तीन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर नारळ पूर्णपणे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. डॉक्टर प्रकाश शेंडगे, डॉक्टर किशोर नाईक व इतर ८ जणांच्या पथकाने हि शस्त्रक्रिया केली. त्याकरिता शस्त्रक्रियेपूर्वी एका नारळावर सराव देखील करण्यात आल्याचे डॉक्टर शेंडगे यांनी लोकमतला सांगितले. यावेळी नारळाला लावलेले सात निरोध व कुजलेला कपडा देखील त्याच्या गुदमार्गातून काढल्याचे त्यांनी सांगितले.
तरुण मानसिक धक्क्यात
सामूहिक बलात्कार व त्यांनतर घडलेल्या कृत्यामुळे पीडित तरुणाला मानसिक धक्का बसला आहे. याचा परिणाम प्रकृतीवर होऊ नये याकिरता त्याच्यावर मानसोपचार तज्ञामार्फत देखील उपचार सुरु आहेत. तर त्याला धक्क्यातून सावरण्यासाठी बळ देण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.
जगातली पहिली घटना
गुदमार्गात नारळ घुसवल्याची अथवा तो काढल्याची जगातली हि पहिलीच घटना आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या शास्त्रक्रिये बाबत कोणत्याच तज्ञाकडे आवश्यक माहिती नव्हती. अखेर शस्त्रक्रियेपुर्वी दिड तासात २०० हून अधिक तज्ञाचे सल्ले घेऊन, आवश्यक सराव करून हि शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
Comments
Post a Comment
Your comments are important for us!