ठाकरे सरकारचे कौतुक काही थांबेना, राजन यांनी ठाकरेंचे केले कौतुक, झापले मात्र मोदींना…

 


देशातील फोफावलेल्या करोना बद्दल अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आणि यातच आता आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी यात उडी घेतली आहे. त्यांनी यावेळी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

दिल्लीमध्ये शिकागो सेंटर विद्यापीठाने आयोजित केलेल्या व्हर्चूअल कार्यक्रमात रघुराम राजन यांनी सध्या भारतात वाढत असलेल्या करोना बद्दल बोलताना म्हंटले की, कोरोनाचे हे संकट स्वतंत्र्यानंतरचे भारतासमोरील मोठे आव्हान आहे. गेल्या काही आठवडयांपासून भारतामध्ये रोज ३ लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद होत आहे. संक्रमनामुळे करोनाची स्थिती अधिक बिघडत आहे.

त्यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारचे कौतुक करताना म्हंटले की, करोना रुग्णांना महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन बेड तरी उपलब्ध करू शकले, मात्र इतर सरकारांना एवढे सुद्धा करता आले नाही. असा त्यांनी केंद्र सरकारवर टोला लगावला.

त्यांनी यावेळी सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्रासाठी भारताने दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता व्यक्त केली. लॉकडाऊनमुळे, देशापुढे मोठे आर्थिक आव्हान उभे राहिल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की, या महामारीला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. लपून नाही तर उघडपणे सुधारणा करण्याची ही वेळ आहे असे म्हणाले.

दुसरी लाट रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. आणि या अपयशाचे कारण म्हणजे, सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव आहे. असे म्हणत त्यांनी केंद्र सरकार आणि मोदींच्या नेतृत्वावर बोट ठेवले आहे.

Comments