
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानच्या विक्षिप्त स्वभावामुळेच त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. २००२ मध्ये दोघांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. कालांतराने या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. असे म्हटले जाते की सलमानमुळेच ऐश्वर्याला या सिनेमात काम मिळाले. पण सलमानच्या स्वभावामुळे दोघांमधली गैरसमजांची दरी वाढतच गेली.
एकवेळ अशी होती की, दोघं लग्न करणार आहे. स्वतः सलमान यासाठी ऐश्वर्याच्या मागे लागला होता. पण ऐश्वर्याला बॉलिवूडमध्ये तिचे नाव पक्के करायचे होते. ऐश्वर्याच्या आई- वडिलांना त्यांचे हे नाते मान्य नव्हते. ज्या रात्री सलमानने ऐश्वर्याच्या घरी जाऊन हंगामा केला, त्यानंतर त्यांच्यातले वाद वाढतच गेले. ऐश्वर्याने सलमानवर शिवीगाळ करण्याचा आणि मारपीट करण्याचा गंभीर आरोप केला होता.
सलमानने त्याने केलेल्या चुकांची माफीही मागितली होती. यानंतर ऐश्वर्याकडे त्यांचे नाते टिकवण्यासाठी दुसरी संधीही मागितली होती. पण सलमानने ऐश्वर्याच्या बाबांशी गैरवर्तवणुक केली. बाबांसोबत झालेल्या असभ्य वर्तवणुकीनंतर ऐश्वर्याने सलानपासून दूर जाण्याचा कायमचा निर्णय घेतला. ऐश्वर्यासोबतचे नाते तुटण्यासाठी सलमानचा स्वभावच कारणीभूत असल्याचे त्याने स्वतः मान्य केले होते. ”आमच्यात कधीही हिंदू- मुस्लिम धर्मावरुन वाद झाले नाहीत. पण माझा अल्लडपणा आमच्या नात्यात आला आणि मी तिला गमावले”, असं तो म्हणाला होता.
Comments
Post a Comment
Your comments are important for us!